Kojagiri Purnima Vrat Katha In Marathi , Kojagiri Purnima Story In Marathi – धर्म शास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून, को जागर्ति? म्हणजे कोणकोण जागरण करत आहे हे पाहते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते. या कारणामुळे या व्रताचे नाव कोजागिरी पौर्णिमा असे पडले.
धार्मिक ग्रंथामध्ये वर्णीत एका श्लोकानुसार –
निशीथे वरदा लक्ष्मी: को जागर्तिति भाषिणी।
जगाति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी।।
तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महीतले।।
कोजागिरी पौर्णिमेची पूजा पद्धत (Kojagiri Purnima Vrat Vidhi In Marathi)
या व्रतामध्ये हत्तीवर बसलेल्या इंद्र आणि महालक्ष्मीचे पूजन करून उपवास ठेवावा. रात्रीच्या वेळी तुपाचे 101 किंवा यथाशक्ती दिवे प्रज्वलित करून देवघर, बाग, अंगण, तुळस, मुख्य प्रवेशद्वार येथे लावावेत. सकाळी स्नान करून इंद्रदेवाचे पूजन करून ब्राह्मणांना तूप-साखर मिश्रित खीर व मिष्टान्न भोजन, दक्षिणा आणि सोन्याचा एक दिवा दिल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
या दिवशी श्रीसूक्त, लक्ष्मी स्तोत्रचे पाठ करावेत. अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा व्रत केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सर्व सुख प्रदान करते.
कोजागिरी पौर्णिमा कथा (Kojagiri Purnima Vrat Katha In Marathi)
प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती. ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती.
संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे. पतीच्या विरुध्द आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता. एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती. एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले.
पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला. जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात. त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले.
ब्राह्मणाने विधिव्रत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धन-संपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले.
Join the Discussion!